माझ्या राजीनामा अमित शहा ठरवतील, मनेका नव्हे !!!
- by Adarsh Maharashtra
- Nov 15, 2018
- 915 views
पुणे : 'अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचे 'एन्काऊंटर' करण्यात आले. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. तरीही निष्कारण माझ्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. पण मी हे स्पष्टपणे सांगतो की, माझा राजीनामा मनेका गांधी नव्हे तर, भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांना टोला लगावला आहे. मुनगंटीवार म्हणाले, 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नही हो सकता ! अवनी वाघिणीच्या बाबतीत तिला मारण्याचा निर्णय हा अपरिहार्य होता म्हणूनच घ्यावा लागला. अवनीच्या मृत्यूबाबत सातत्याने काही जणांनी मुद्दाम गैरसमज पसरवले. तब्बल ६० किमी दूर असलेल्या अंबानींच्या प्रकल्पासाठी अवनीला मारण्यात आले, अशीही अफवा काहींनी हेतूपुरस्सर पसरवली. पण अशा गोष्टींना काहीही अर्थ नाही. असे गैरसमज पसरवणे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले.'
अवनी वाघिणीच्या मृत्यूचे समर्थन करताना मुनगंटीवार म्हणाले की, आपल्याला संवर्धन नक्की कोणाचे हवे, हे ठरविण्याची वेळ आज आली आहे. संवर्धन वाघाचे हवे की नरभक्षक वाघाचे ?... नरभक्षक अवनीच्या मृत्युला थेट व्याघ्रसंवर्धनाशी जोडू पाहणे हे सपशेल चुकीचे आहे. अवनीची पिले ही जगूच शकणार नाहीत, असे परस्पर तर्कट मांडणेही योग्य नव्हे. जंगलात अशा घटना अनेकदा घडत असतात. जेव्हा एखादा वाघ किंवा वाघीण एखाद्या हरिणीला मारते, तेव्हा त्या हरिणीची पिले नैसर्गिकरीत्या वाढतातच की नाही ?... असे शेकडो प्राणी रोज शिकारीत मरतातच. त्यानंतर त्यांची पिले निसर्गतः वाढतात. त्यामुळे, अवनीच्या पिलांबाबत निष्कारण गैरसमज कुणीही पसरवू नये. त्यांच्या रक्षणासाठी वनविभाग प्रयत्नशील आहेच.
महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन व ग्लोबल कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘हॉर्टी प्रो २०१८’ या हॉर्टीकल्चर वर आधारित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना तसेच पुण्यात पत्रकारांशी बोलताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष शिदोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वास जोगदंड आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम