माणगांव पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप देशमुख यांचे बालकांचे हक्क या विषयावर बालसभेतील आदिवासी मुला मुलींना ऑनलाईन मार्गदर्शन

बोरघर/माणगांव :सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व विकास दीप संस्था, अमरदीप संस्था आणि सेंटर फॉर सोशल एॅक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी माणगांव येथील सर्व विकास दीप या संस्थेमध्ये आयोजित बालसभेतील मुला मुलींना माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक माननीय श्री. प्रदीप देशमुख यांनी बालकांचे हक्क या विषयावर ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. 

सदर बालसभेत माणगांव तालुक्यातील सुमारे एकोणीस आदिवासी वाडयांतील दहा ते सतरा वर्षे वयोगटातील मुला मुलींनी सहभाग घेतला होता. बालसभेतील आदिवासी समाजातील या मुला मुलींना माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक माननीय श्री. प्रदीप देशमुख सरांनी शिक्षणाचे महत्त्व, पोलीस भरती आणि अन्याय अत्याचार विरोधात आपल्याला कायदेशीर मदत कशी मिळवता येते या संदर्भात मौलिक असे मार्गदर्शन केले. 

बालसभेतील मुला मुलींनी आपल्या मनातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप देशमुख साहेबांनी मुलांना समजेल अशा सरळ आणि सोप्या भाषेत देऊन त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले. 

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

संबंधित पोस्ट