७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तान रोट्राॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल, तर्फे विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न

रायगड (प्रतिनिधी७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  रोट्राॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल, तर्फे विनामूल्य वैद्यकीय तपासणी शिबिर संपन्न करण्यात आला.

झोन १, आरआयडी ३१३१आणि डॉ. सलमा मुजावर, रोहा यांनी शहरातील लोकांसाठी सामुदायिक सेवा म्हणून रोहा येथे विनामूल्य वैद्यकीय तपासणी आयोजित केली होती यावेळी मोठ्या प्रमाणत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये

विविध आरोग्य तपासणी चाचण्या प्रामुख्याने रक्तदाब आणि फुफ्फुसाचे कार्य चाचणी (एलएफटी) घेण्यात आल्या. कोविड१९, एक वर्ष घेत असलेल्या एलएफटी एक महत्वाचा विषय होता ज्यामुळे लोकसंख्येच्या श्वसन प्रणालीवर परिणाम झाला होता. कार्यक्रमात

या प्रोजेक्टचे अध्यक्ष रोटारॅक्ट क्लब रोहा सेंट्रल जनसंपर्क अधिकारी  रशीद शेख होते.

प्रायोजित  रोट्राॅक्ट क्लब रोहा सेंट्रलच्या रोटरीयन्सच्या उपस्थितीत हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

  शिबिरासाठी प्रेसीडेन मयूर दिवेकर, सुचित पाटील, रूपेश कर्णेकर, निखिल दाते, राकेश कागदा, आकाश रुमाडे, देवश्री जंगले, औमकर जंगम, वैष्णवी पोटे, यश शिंदे, सार्थक शिंदे, नील डिसूझा, आशुतोष नांदगावकर, सृष्टी वणी, संकेत महाडिक यांसह अनेक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ सल्मा मुजरवार यांचा रोट्राॅक्ट क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला .

सदर कार्यक्रमामुळे ६ ते ६५ आणि त्यावरील वयोगटातील विविध चाचणीसाठी आलेल्या अनेक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

संबंधित पोस्ट