जनता दल ( सेक्युलर ) च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी रवि भिलाणे यांची नियुक्ती

शाहीर संदेश गायकवाड मुंबई सचिव

मुंबई,दि.२ (प्रतिनिधी) ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलनाचे निमंत्रक आणि जेष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते रवि भिलाणे यांनी जनता दल ( सेक्युलर )पक्षात प्रवेश केला असून त्यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने एका पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.भिलाणे यांच्यासोबत चित्रपट अभिनेते आणि लोकशाहीर संदेश गायकवाड यांनीही जनता दलात प्रवेश केला असून त्यांची मुंबई सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

चर्चगेट येथील पक्ष कार्यालयात झालेल्या समारंभात जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष मा. आमदार शरद पाटील आणि जनरल सेक्रेटरी प्रताप होगाडे यांनी रवि भिलाणे तसेच संदेश गायकवाड यांचं पक्षात स्वागत केलं.या वेळी माजी आमदार श्रीपती शिंदे,मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर,मुंबई महासचिव ज्योतीताई बडेकर आदी पदाधिकारी तसेच पत्रकार संजय शिंदे,बाळासाहेब पगारे,सीताराम लवांडे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आपण लवकरच माजी पंतप्रधान आणि पक्षप्रमुख एच.डी. देवेगौडा यांची भेट घेऊन राज्यात पक्ष बांधणीला जोमाने सुरवात करणार असल्याचे  रवि भिलाणे यांनी म्हटलं आहे.

          

संबंधित पोस्ट