कऱ्हे येथील चुन्याचा पाडा नळ योजना अपूर्णावस्थेत,ग्रामस्थाची चौकशीची मागणी

पालघर(प्रतिनिधी) : ग्रुप ग्रामपंचायत कऱ्हे-तळावली  अंतर्गत कऱ्हे चुन्याचा पाडा करिता २०१७ साला मधी २ लाख ९४ हजार खर्चून लघु नळ योजना करण्यात आली. मात्र तीन वर्षात या नळ योजने अंतर्गत एकदा ही पाणी आले नसल्याचा ग्रामस्थानी आरोप केला असून. पाईप लाईन व नळ स्टेंडपोस्ट तुटल्याने पाणी भरण्यासाठी महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सूर्या धरणापासुन केवळ १०-११ किलोमिटर असलेल्या गावात मार्च-एप्रिल-मे मधे भीषण पाणी टंचाई जाणवत असते.

ही नळ योजना चालू करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समिती कडे अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही ह्या नळ योजना गेल्या ३ वर्षात चालू करण्यात आली नसुन तुटलेले नळ, तुटलेले नळ स्टेंडपोस्ट व चौथरा फक्त गावात दिसत आहेत. त्यामुळे येथील महिलांना पाण्यापासून वंचित राहून पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागते. या सर्व तक्रारी करूनही कऱ्हे-तलावळी  ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. 

ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून ही एकदा ही नळाला पाणी आले नाही. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याची शंका नागरीकांनी उपस्तितीत केली आहे. या बाबत लवकरच जि.प अध्यक्षा भारती कामडी यांची भेट घेऊन या पाणी पुरवठा योजनेची चौकशीची मागणी करणार असल्याचे ग्रामस्थानी सांगीतले. 

१)प्रतिक्रिया:- 

गेल्या ३ वर्षा पासुन या पाणी पुरवठा योजनेतुन एकदा ही नळाला पाणी आले नाही. त्यामुळे आम्ही पाण्यापासून वंचित राहून पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागते. या सर्व तक्रारी देऊनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले आहे. 

टंचाई पासून व पाणी भरण्याची महिलांनी पायपीट करू नये याकरिता ही नळ योजना तातडीने चालू करावी. 

 -नीता मधुकर तुंबडा 

(स्थानिक महिला, कऱ्हे चुन्याचापाडा)


२) प्रतिक्रिया, 

 ग्रामपंचायतीला व पंचायत समितीला लेखी व तोंडी तक्रार ही केली आहे. नळ योजना चालू करून पाणी पुरवठा सुरळीत करावा.        

 -संजू राठड 

 (ग्रामस्थ कऱ्हे चुन्याचापाडा)


प्रतिक्रिया-

या आधी ही योजना चालू होती.

होल्टेज प्रॉब्लेम मुळे ही नळ योजना चालू होत नाही.

-सुलोचना लांघी ग्रामसेविका 

(ग्रामपंचायत, कऱ्हे-तळावली) 



संबंधित पोस्ट