साथ भाजपला की काँग्रेसला; हवेचा अंदाज पाहून ठरवू- आठवले
- by Adarsh Maharashtra
- Nov 10, 2018
- 1343 views
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सहा-सात महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना युती-आघाडीमध्ये कोणते पक्ष सहभागी होणार याची चर्चा सुरु असतानाच रामदास आठवलेंनी सवयीप्रमाणे एक फुगा सोडलाय, आपण हवेचा अंदाज घेऊन कोणाला साथ द्यायची याचा निर्णय घेणार असल्याचे असे त्यांनी म्हटले. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले. काँग्रेस आमदार नसीम खान यांनी आठवले यांनी काँग्रेससोबत यावे असे वक्तव्य केले. त्यावेळी आपल्या भाषणात रामदास आठवले यांनी फटकेबाजी करत काँग्रेसलाही चिमटे काढले. रामदास आठवले म्हणाले, मी १०-१५ वर्षे काँग्रेससोबत होतो. त्यामुळे मला भाजपसोबतदेखील १५-२० वर्षे राहावेच लागणार. त्यामुळे जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपसोबत राहणार असल्याचे आठवलेंनी सांगत आपण हवेचा अंदाज घेत असून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. आपल्याला मंत्रिपदाची हाव नाही. माझे कार्यकर्ते तळागाळात असल्यामुळे मला मंत्रिपदाची चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पर्याय खुले असल्याचे सूतोवाच आठवले यांनी केले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याआधीदेखील आठवले यांनी भाजपच्या विसंगत भूमिका घेतल्या आहेत. राम मंदिराच्या जागी बुद्धविहार असल्याचे सांगत अयोध्येत बुद्धविहार बांधण्याची मागणी केली होती.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम