टी-२० महिला विश्वचषकात भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय;कर्णधार हरमनप्रीत कौरची शतकी खेळी

गयाना - कर्णधार हरमनप्रीत कौरच्या शतकी खेळीच्या जोरावर, पूनम यादव आणि दयालान हेमलता यांनी केलेल्या धारदार गोलंदाजीच्या बळावर भारताने टी-२० विश्वचषकात विजयी सलामी दिली. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ३४ धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. २० षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात १९४ धावांचा डोंगर रचला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ५१ चेंडूत १०३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्यात ८ षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता.  जेमिमा रोड्रिग्ज ५९ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. न्यूझीलंडकडून लीने १८ धावा देत २ गडी बाद केले.भारताने दिलेल्या १९४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने २० षटकात ९ बाद १६० धावा केल्या. सूजी बेट्सने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर यष्टीरक्षक मार्टिनने  ताबडतोब ३९ धावा केल्या. भारताकडून दयालान हेमलता आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी ४ षटकात प्रत्येकी ३ बळी घेतले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट