शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेसची सहानुभूती- नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

जगदलपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये प्रचार सभेला संबोधित काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेस सरकार तुझे-माझे करणाऱ्या विचारांचे होते. आम्ही सबका साथ, सबका विकास या नीतीवर काम करत आहोत. मी जेव्हाही येथे आलो, काहीना काही योजना या भागाच्या विकासासाठी घेऊन आलो. जे विकास करत नव्हते, ते नक्षली आणि माओवाद्यांचे नाव घ्यायचे. ते म्हणत की तेथे (छत्तीसगड) काहीच काम होऊ शकत नाही. मात्र आम्ही करून दाखवले. शहरी नक्षलवादी वातानुकूलित घरांत राहतात. त्यांची मुले परदेशात शिकतात.चांगल्या गाड्या वापरतात. मात्र तेथे बसल्या-बसल्या ते रिमोटद्वारे आमच्या मुलांच्या हाती बंदुका सोपवतात.’मोदी म्हणाले की, आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झाले त्यापैकी सर्वाधिक वेळा मी बस्तरला आलो असेन. मी कधीच रिकाम्या हाताने आलो नाही. विकासाची कोणती ना कोणती योजना घेऊनच आलो. तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करणे हा त्याचा हेतू होता. तुमच्या नव्या पिढीला गरिबापासून मुक्त करायचे आहे. बस्तरमधून रोग, भूकबळी, गरिबी दूर पळवायची आहे.
  आता आपले छत्तीसगड १८ वर्षांचे झाले आहे. अठरा वर्षांपर्यंत घरी मुलांच्या गरजेच्या वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. घरात १८ वर्षांचा मुलगा असो वा मुलगी त्यांच्या गरजा बदलतात. त्यांचा खर्च वाढतो. छत्तीसगड राज्य १८ वर्षांचे झाले आहे. दिल्लीत बसलेले सरकार तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सरकारे तर यापूर्वीही होती. मात्र विकास का झाला नाही? पैसे तर आधीही होते, योजनाही होत्या, मात्र कारभार दलालांच्या हाती होता. खालपर्यंत काहीच पोहोचत नव्हते. आम्ही दलालांचा सुपडा साफ केला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट