विक्रोळी विधानसभेत रक्तदानाच्या महायज्ञात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंड:(शेखर भोसले) शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.  यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचं जाहीर करत सामाजिक संस्था व राजकीय पक्षांना रक्तदान शिबिरे भरवण्याची तसेच जनतेला या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्याची हाक दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत कोविडच्या संकटात रक्ताची टंचाई भासू नये म्हणून विक्रोळी विधानसभेचे शिवसेना आमदार सुनिल राऊत यांनी आपल्या विक्रोळी मतदारसंघामध्ये रविवार दि २० डिसेंबर रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजित केले होते.
विक्रोळी विधानसभेतील कन्नमवार शाखा क्रमांक ११९, कांजुरमार्ग शाखा क्रमांक ११७ तसेच पवई शाखा क्रमांक १२२ अश्या एकूण ३ ठिकाणी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला व एकूण १२७२ रक्तदात्यांनी रक्तदान करत मानवधर्म पाळला. ह्या महा रक्तदान शिबिरातील कन्नमवार नगर येथील रक्तदान शिबिरात ६८९ बाटल्या कांजूरमार्ग येथील रक्तदान शिबिरात ३१९ बाटल्या तर पवई येथील रक्तदान शिबिरात २६४ बाटल्या असे सर्वमिळून एका दिवसात एकूण १२७२ बाटल्या रक्त जमा झाले.

"पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत गरजूंना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी विक्रोळी मतदार संघात ३ ठिकाणी महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देवून रक्तदान केल्याने विक्रोळी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक,  रक्तदाते आणि सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार" अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने आ. सुनिल राऊत यांनी दिली आहे.
 
या रक्तदान शिबिराच्या आयोजनात विजय सोनमले, उपेंद्र सावंत, शेखर जाधव, अनंत पाताडे, परम यादव, अभय राणे, सचिन मदने, रवी महाडिक, राजेश सोनावळे, दिपक सावंत आणि अन्य शिवसैनिकांनी मेहनत घेतली. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट