जयदेव- उद्धव ठाकरे बंधूंतील मालमत्तेचा वादावर अखेर पडदा , जयदेव यांनी घेतली उच्च न्यायालयातून याचिका मागे
- by Adarsh Maharashtra
- Nov 03, 2018
- 1674 views
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद संपुष्टात आला असून बाळासाहेबांच्या इच्छापत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, असे त्यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छापत्राला जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. या खटल्यात शुक्रवारी जयदेव ठाकरे यांनी हायकोर्टात अर्ज दिला. खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही, त्यामुळे याचिका मागे घेत असल्याचे त्यांनी हायकोर्टात सांगितले.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सुनावणी दरम्यान जयदेव यांनी काही गौप्यस्फोट केल्यानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली होती. ‘बाळासाहेब त्यांच्या मालमत्तेतील वाटा मला द्यायला तयार होते. ही बाब खुद्द बाळासाहेबांनीच मला सांगितली. मात्र त्यावरून उद्धव आणि माझ्यात वाद नको म्हणून उद्धव याच्याकडे त्याबाबत वाच्यता न करण्याचेही त्यांनी मला सांगितले होते. परंतु त्याआधीच म्हणजे २०११ मध्ये उद्धवने काही कागदपत्रांवर बाळासाहेबांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. ती कागदपत्रे कशाबाबत होती हे खुद्द बाळासाहेबांनाही माहीत नव्हते’, असे त्यांनी सुनावणीदरम्यान हायकोर्टात सांगितले होते.
ऐश्वर्य माझा मुलगा नाही..बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव यांनी हायकोर्टात केला होता गौप्यस्फोट
बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात जयदेवला काहीच देण्यात आले नाही परंतु जयदेवचा मुलगा ऐश्वर्यला एक मजला देण्यात आला आहे. यावर त्यांनी ‘ऐश्वर्य माझा मुलगा नाही ’ असा गौप्यस्फोट जयदेव ठाकरे यांनी केला होता .
संबंधित पोस्ट
Support US
विश्वसनीय पत्रकारितेसाठी तुमचा सहभाग आणि योगदान आवश्यक आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
Support US
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम