मुंबईतील कोरोनाची स्तिथी पाहूनच लोकलचा निर्णय , पालिका आयुक्तांची भूमिका
- by Adarsh Maharashtra
- Nov 23, 2020
- 1213 views
मुंबई दि.२३:मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावरुन अनेक तर्क-वितर्क सुरु आहेत. दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करावी की नाही याबाबत विचारविनिमय सुरु आहेत. मात्र मुंबईतील कोरोनाची परिस्थिती पाहून सर्वसामान्यांसाठी लोकलचा निर्णय होईल, असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी केले आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती पाहूनच मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यावर निर्णय घेतला जाईल. पुढील एक किंवा दोन आठवडे मुंबईतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. यानंतर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.
मुंबई महापालिका आयुक्तांच्या या वक्तव्या नुसार सध्या तरी पालिका प्रशासन आणि राज्य सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहे.
मुंबईसाठी पुढील तीन ते चार आठवडे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या तरी, मुंबईत कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तीन ते चार आठवड्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. तर दुसरीकडे कोरोनाचा वाढता आकडा पाहता मुंबईतील सर्व शाळा मात्र ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आल्या मुळें विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम