2020 या वर्षात गोवंडी परिसरातील 21 तरुण मुली गायब/बेपत्ता,मुंबई पोलिस काही लपवत आहे का? - किरीट सोमैया

मुंबई2020 मध्ये गोवंडी पोलिस सटेशन परिसरात 21 मुली गायब/बेपत्ता झाल्या. मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावरून मिळालेल्या माहिती नुसार गोवंडी 21, शिवाजीनगर 0, मानखुर्द 4, देवनार 2 अश्या प्रमाणे संबंधीत परिसरतून तरुण मुली गायब होण्याचा प्रकार समोर आलेला आहे. गांभिर्याची बाब  ही की यातील 8 मुली या अल्पवयीन होत्या!

आज भाजपा नेते किरीट सोमैयांनी गोवंडी पोलिस स्टेशन येथील वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली व त्यांना सदर माहिती दाखवून या प्रकारात स्पष्टीकरण देण्यास सांगितले. तर “ नेहमीच अश्या 5-50 मुली बेपत्ता होत असतात” असे बेजवाबदार व असंतोषजनक उत्तर मिळाले.

गायब/ बेपत्ता होणार्‍या मुलींचे वय लक्षात घेतले तर या सर्वच तरुण युवती असल्याचे लक्षात येते. त्यातच भरीस भर 8 मुली 18 वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन आहेत. सदर प्रकार हा तरुणयुवतींना प्रलोभन देऊन पळवण्याचा आहे व नंतर या मुलींचा सेक्शुअली उपभोग घेऊन झाल्यावर त्यांना परत पाठवून दिले जाते असे किरीट सोमैयांचे मत आहे.

जर गोवंडीमध्ये 21 मुली बेपत्ता झाल्या मग शिवाजीनगर मध्ये 0, मानखुर्द मध्ये 4 आणि देवनार मध्ये 2 मुली बेपता झाल्या. हा पुर्ण परिसर एकमेकास संलग्न म्हणजे आसपासचा आहे मग या आकड्यांमध्ये एवढी तफावत / फरक का? मुंबई पोलिसांनी यावर स्पष्टीकरण द्यावे!

मुंबई पोलिस आकड्यांमध्ये फेरफार करुन काही लपवत तर नाही आहे ना???

राष्ट्रीय महिला आयोगने (National Commission For Women) सदर प्रकरणाची दखल घेतली आहे, आणि महाराष्ट्र मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक महाराष्ट्र यांच्या कडून सबंधित विषयाचा अहवाल (रिपोर्ट) मागवला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट