ठाकरे सरकार शिवसेनेला जबाबदार धरत जळगावात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव : एसटी महामंडळातील कमी पगार, अनियमिततेला कंटाळून जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (३०, रा.कुसुंबा, ता.जळगाव) या कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसांचे ठाकरे सरकार (शिवसेना) हेच माझ्या आत्महत्येला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.यावेळी भाऊ,पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयात मनोजचा भाऊ सागर याने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मनोज हा चार वर्षापासून एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होता. सुरुवातील मुक्ताईगर येथे ड्युटी होती. त्यानंतर जळगाव आगारात बदली झाली. मनोज याची ड्युटी सतत लांब पल्ल्याच्या गाड्यांवर लावली जात होती. तो अनेकांची ड्युटी विभागून घेत होता, मात्र त्याची वेळ यायची तेव्हा त्याला कोणीच मदत करीत नव्हते. त्यात तीन महिन्यापासून पगार नाही. झाला तर वेळेवर होत नाही. त्यात कमी पगार, अनियमतता. सरकारचा कारभार याला कारणीभूत आहे. हे त्यांनी चिठ्ठीतच लिहीले आहे. माझा भाऊ गेला, त्याला कोण परत आणून देणार असे म्हणत आक्रोश करीत होता.

मनोज याच्या पश्चात वडील अनिल चौधरी, पत्नी ऐश्वर्या, भाऊ सागर व भावजयी असा परिवार आहे. दोन्ही भावंड लहान असतानाच आईचे निधन झाले आहे. मनोज व सागर दोघं भाऊ एकमेकांचे साडू आहेत. त्यांची सासरवाडी जामनेर येथील आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णालय गाठून महामंडळाविषयी संताप व्यक्त केला. आमदार सुरेश भोळे यांनीही रुग्णालयात येऊन मनोजच्या कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट