एसटी कामगारांच्या लढ्याला गोदी कामगारांचा जाहीर पाठिंबा

मुंबई, दि.९ : कोरोना काळात खऱ्या अर्थाने एसटी कामगारांनी जनतेची सेवा केली.  दिवाळीचा सण काही दिवसांवर आला असून देखील एसटी कामगारांना ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा तीन महिन्यांचा अद्याप पगार दिला नाही. एसटी प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय अजून घेतला नाही, एसटी कामगारांना तीन महिन्याचा पगार, महागाई भत्ता तसेच सणासाठी उचल ताबडतोब मिळावी,  या मागण्यांसाठी आजपासून सुरू झालेल्या आक्रोश आंदोलनाला  व न्यायालयीन लढ्याला बंदर व गोदी कामगारांचा जाहीर पाठिंबा आहे, असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के.  शेट्ये,  जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज यांनी सांगितले.

महाराष्ट्रात एक लाख एसटी कामगार असून त्यांच्यावर जवळजवळ कुटुंबातील पाच लोक अवलंबून आहेत. एसटी प्रशासनाने कामगार कराराचा व वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्यामुळे एसटी कामगारांमध्ये खूप नाराजी आहे. कामगारांच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा.अनिल परब यांनी एसटी कामगारांना तीन महिन्यांचा पगार व इतर मागण्या ताबडतोब मान्य कराव्यात तसेच एसटी सेवा ही लोकसेवा आहे, असे मानून एसटी   कामगारांना सरकारी कामगार म्हणून जाहीर करावे. भविष्यकाळात एसटी कामगारांचा  विलनिकरणासाठी सर्वात मोठा व निर्णायक संप होईल, त्यावेळेस महाराष्ट्रातील सर्व कामगार प्रत्यक्ष आंदोलनात उतरतील याची नोंद महाराष्ट्र शासनाने घ्यावी.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट