अंतर निर्देशक (मैलाचे दगड) पुनर्स्थापना समारंभ महापौर किशोरी पेडणेकर व आमदार यामिनी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
- by Adarsh Maharashtra
- Nov 08, 2020
- 2163 views
मुंबई दि.८ : ब्रिटिश राजवटीतील मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणारे मुंबई शहरात मैलामैलावर रोवण्यात आलेले अंतर निर्देशक (मैलाचे दगड) जे काळाच्या ओघात अस्तंगत होत चालले होते त्यांचे संवर्धन व जतन करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोचविण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाच्या प्रयत्नाने पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून हे दगड पुनर्स्थापित करण्याच्या कामाचा शुभारंभ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते आज दि. ०८ नोव्हेंबर २०२० रोजी आर्थर रोड नाका येथे पार पडला.
महापौर किशोरी पेडणेकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, सदर मैलाच्या दगडाचे ऐतिहासिक दर्जा टिकून राहण्या साठी त्याचे जतन करणे आवश्यक असून त्या अनुषंगाने सध्या अस्तित्वात असलेल्या मैलाच्या दगडाचे जतन, संवर्धन व सुशोभी करण करण्याचे काम बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागातर्फे करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले ब्रिटिश राजवटीत मुंबई शहरात सेंट थॉमस कॅथड्रल चर्च, हाँर्निमल सर्कल, फोर्ट, मुंबई येथे शून्य मैल प्रमाणित करून तेथून प्रत्येक मैलावर अंतर निर्देशक (मैलाचे दगड) रोवण्यात आले होते. सदर मैलाचे दगड सन १८३७ च्या पूर्वी मुंबई शहरातील मुख्य रस्त्यांवर दक्षिणेपासून उत्तरेकडे बसविण्यात आले. सदर मैलाचे दगड हाँर्निमल सर्कल ते शीव पर्यंत बसविण्यात आले होते.त्याकाळी सर्व मुख्य रस्ते सेंट थॉमस चर्चपासून सुरु होत होते. तसेच त्याकाळी मुंबई शहरात फारच थोडे रस्ते होते व जनता या रस्त्यांवरून घोड्याने प्रवास करीत. जनतेला/ प्रवाशांना सेंट थॉमस चर्च पासूनचे अंतर समजण्यासाठी हे मैलाचे दगड बसविण्यात आले होते. त्याकाळी मुंबईमध्ये टाऊन हाँल अथवा पोस्ट ऑफिस असे महत्त्वाची वास्तू शहराच्या दक्षिण टोकाला अस्तित्वात नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांनी सेंट थॉमस चर्च या मुंबईतील सर्वप्रथम अँग्लियन चर्च धार्मिक स्थळाची शून्य मैलासाठी निवड केली.
हेरिटेज सूचीमधील १५ मैलाच्या दगडांपैकी पाच ठिकाणाचे मैलाचे दगड नष्ट झाल्याचे निर्दशनास आले आहे. उर्वरित १० मैलाचे दगड रस्ते व पदपथांची उंची वाढल्यामुळे जमिनीत गाडले गेले. सदर १० दगडांपैकी एफ/ दक्षिण विभागाने डॉ. एस.ए. राव मार्गावरील मैलाचे दगडाचे जीर्णोद्धार केलेले आहे. उर्वरित मैलाच्या दगडाचे पुनर्स्थापित करण्याचे काम लवकरच करण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम