आरक्षणाच्या नावाखाली समाजाची माथी भडकवू नका

मुंबई(प्रतिनिधी) : एकीकडे सर्वधर्म समभावाचा नारा द्यायचा  जात-पात मानू नका यावर लंबी-चौडी भाषणे द्यायची. जातीभेद विसरून कोणा युवक-युवतीने विवाह केला तर त्यांना मारहाण करायची आणि दुसरीकडे जातीच्या नावाखाली आरक्षण मागायचे आणि वर शाहू-आंबेडकर, फुले-शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र म्हणायचे;सत्तेची खुर्ची मिळविण्या करता जातीचा आधार घ्यायचा केवढा हा विरोधाभास.आरक्षणाच्या नावाखाली सामाजिक तेढ निर्माण होणे योग्य वाटत नाही असे मत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तां कडून सन्मानित दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

केवळ शासकीय क्षेत्रात आरक्षण मागणारे खासगी क्षेत्रातही आरक्षण का मागत नाहीत; हाही प्रश्न आहे. उद्या जर सर्वच जाती धर्माचे,पंथाचे लोक जर आरक्षण मागून रस्त्यावर उतरून आंदोलने करू लागले तर काय बिकट समस्या निर्माण होईल याचा विचार समाजधूरिनांनी करणे गरजेचे आहे.याकरता सर्वांमध्ये समन्वय, एकोपा असणे गरजेचे आहे.आरक्षणाचा तिढा सर्वसमावेषकपणे सोडविणे गरजेचे आहे.आज राज्यात सरकारी खात्यात पावलोपावली बोकाळलेला भ्रष्टाचार खाबुगिरी,सर्वसामान्याची केली जाणारी फसवणूक,वाढती गुन्हेगारी यावर मात्र कोणीही बोलताना दिसत नाहीत अशी खंत शिरवडकर यांनी व्यक्त केली.

मनात आणले तर आरक्षणाचा प्रश्न सहज सुटु शकतो.  परंतु तसे होताना दिसत नाही. प्रसिद्धी माध्यमांसमोर तावातावाने बोलून उपाशीपोटी असलेल्या समाजाची, भरल्या पोटी असणारे दिशाभूल करीत राजकीय स्वार्थ साधताना दिसतात हे कटू सत्य आहे.

आरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या चुली मांडून दुकानदारी करणाऱ्यांनी एका छता खाली येणे गरजेचे आहे. विनाकारण रस्त्यावर उतरून, गर्दी करून तमाम समाजाला वेठीस का धरले जात आहे?आज युवकांची माथी भडकवून त्यांना आंदोलन, जाळपोळ करण्यास भाग न पाडता,सर्वांना मोफत शिक्षण, रोजगार निर्मित प्रशिक्षण, अल्प व्याजाने व्यवसायाकरता कर्ज व अन्य असणाऱ्या समस्या दूर करणे गरजेचे आहे. युवाशक्ती आंदोलने,जाळपोळ, रास्ता रोको ह्या विघातक गोष्टींकरता खर्च न करता विधायक कामासाठी वापरली जावी.असे मत दीपक शिरवडकर यांनी व्यक्त केले.

                       

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट