ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

मुंबई.(विशेष प्रतिनिधी) ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबईतील राजभवनात समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता वचन दिले आहे.

यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळा बाबात चर्चा केली असता राज्यपालांनी राज्य सरकारला सकारात्मक निर्देश देण्याचे वचन दिले. तसेच ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे यांनी ब्राह्मण समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या व त्यांच्या ग्रामीण भागातील अडचणी मांडल्या. तर मकरंद कुलकर्णी यांनी राज्य सरकार सोबत आजमितीस झालेला पत्रव्यवहार व आजची स्थिती कथन केली. त्याच बरोबर संजीवनी पांडे यानी ब्राह्मण समाजातील महिला त्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती बाबत अडचणी कथन केली. तसेच ॲड. आरती सदावर्ते - पुरंदरे यांनी ब्राह्मण समाजावर होणाऱ्या लिखाणावर बंदी घालावी व ब्राह्मण समाजाच्या  संरक्षणासाठी कडक कायदे करावे असे ही त्या म्हणाले.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सगळ्या अडचणी ऐकून घेऊन तसेच सकारात्मक चर्चा करून राज्य सरकारला निर्देश देण्याचे अभिवचन दिले. या शिष्ट मंडळात ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी, ब्रम्ह महा शिखर परिषदेचे प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, मकरंद कुलकर्णी, संजीवनी पांड, ॲड. आरती सदावर्ते - पुरंदरे हे उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट