आज होणार मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस, सानुग्रह अनुदानाबाबतचा निर्णय

मुलुंड: (शेखर भोसले) मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या बोनस, सानुग्रह अनुदाना संदर्भात शुक्रवार दि २३ ऑक्टोबर रोजी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याबरोबर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची प्रदीर्घ चर्चा झाली असून त्यानुसार दिवाळीपूर्वी पालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे नक्की करण्यात आले असल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.


आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत समन्वय समितीने स्पष्ट केले की,पालिका कर्मचाऱ्यांनी कोविड १९ विरुद्ध जोरदार लढा दिला असल्याने सर्व कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी समितीने केली असून पालिका अंदाज पत्रकात १५४ कोटी रुपयांची तरतूद असल्याने त्याप्रमाणे असलेल्या १७००० रुपये सानुग्रह अनुदानात वाढ़ करून २०००० रुपये प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात यावे तसेच कंत्राटी कामगार, आरोग्यसेविका व २०१६ मध्ये नेमलेल्या आरोग्य सेविकांना भाऊबीज भेट देण्यात यावी अशी मागणी आयुक्तां सोबत झालेल्या चर्चेत करण्यात आली. मुख्यमंत्रांशी चर्चा करून आज शनिवार दि २४ ऑक्टोबर रोजी आयुक्त आय चहल  याबाबत कळविणारअसल्याचे समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.

गटविमा योजना लवकर सुरु करण्यात येणार असून सध्या त्याअंतर्गत २ लाख रुपयां पर्यंतचा खर्च मिळत आहे. यासाठी अर्ज स्वीकारले जाणार असून येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज निकाली काढण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहेत. ही रक्कम ५ लाखांपर्यंत देता येत नसेल तर उर्वरित रक्कम नंतर देण्यात यावी, समितीच्या या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आयुक्तांनी मान्य केले आहे. 

कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये केंद्र सरकारने दिले नाही तर महापालिका आपल्या निधीतून ५० लाख रुपये देईल, वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीत सामावून घेण्याचे तसेच ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी एकत्रितपणे देण्यासाठी विचार केला जाईल, वेतन विसंगतीसमोर समन्वय समितीला प्रथम सुनावणी घेण्यात येईल, इत्यादी मागण्यांबाबत आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे बाबा कदम यांनी सांगितले. 

या चर्चेच्या वेळी समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम, सत्यवान जावकर, ऍड प्रकाश देवदास, दिवाकर दळवी, वामन कविस्कर, सुभाष पवार, के.पी.नाईक, मानसी कानिटकर, अशोक जाधव, के.के.सिंह, साईनाथ राजाध्यक्ष तसेच प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, काकाणी वेल रासू, रमेश पवार, सह आयुक्त तसेच प्रमुख कामगार अधिकारी उपस्थित होते.  

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट