पालिकेच्या एस वॉर्डच्या कर्मचाऱ्यांना मनसेतर्फे मास्कचे वाटप
- by Adarsh Maharashtra
- Oct 23, 2020
- 758 views
मुलुंड :(शेखर भोसले) महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या "मास्क नाही, प्रवेश नाही" या नियमानुसार भांडुप विभागातील कोणत्याही नागरिक मास्कशिवाय अडचण होवू नये यासाठी
घटस्थापनेच्या दिवशी दि १७ ऑक्टोबर रोजी भांडुपमधील रहिवाशांना तसेच पालिकेच्या एस वार्डमधील कर्मचाऱ्यांना सर्जिकल मास्कचे मोफत वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना एस विभागाच्या माध्यमातून, प्रभाग संघटक संतोष पार्टे यांच्यातर्फे करण्यात आले.
सर्वत्र कोरोनाचे सावट सुरू असताना आणि अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असताना, पालिकेच्या एस वार्डमधील काही कामगार वर्ग आपला जीव धोक्यात घालून अजूनही काम करत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, कोरोना पासून बचावासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना एस विभाग यांच्यातर्फे एस वार्डमधील नागरिकांच्या समस्या निवारण करणाऱ्या आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, घनकचरा विभाग, परीक्षण विभाग, पर्यावरण व उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांना तसेच विभागातील नागरिकांना सर्जिकल मास्क भेट देण्यात आले. प्रभाग संघटक संतोष पार्टे यांच्या साथीने उपप्रभाग संघटक संतोष मयेकर तसेच मनसे रस्ते,साधन-सुविधा व आस्थापनाचे उपाध्यक्ष बाबासाहेब अवघडे, ईशान्य मुबंई शासकीय सल्लागार रोहन सुर्वे व इतर सहकारी उपस्थित होते.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम