मुलुंडच्या अपेक्स हॉस्पिटलला चौकशी होईपर्यंत नवे कोरोना रुग्ण दाखल करण्यास पालिकेची मनाई

मुलुंड :(शेखर भोसले) गेल्या आठवड्यात जनरेटरला लागलेल्या आगीमुळे मुलुंडच्या अपेक्स कोविड रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र स्थलांतरित केलेल्या एका ५५ वर्षाच्या रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाने वेळीच माहिती दिली नसल्याचा तसेच उपचाराच्या नावाखाली हे रुग्णालय मोठया प्रमाणात पैसे वसूल करत असल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने या रुग्णालयाची चौकशी सुरु केली असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या रुग्णालयाला नवीन कोरोना रुग्ण दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे टी वॉर्डचे सहा.आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले.


सोमवार दि १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५-३० च्या सुमारास मुलुंडच्या अपेक्स कोविड रुग्णालयाच्या 
जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. या आगीमुळे रुग्णलयात दाखल असलेल्या ३९ कोविड रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले होते. या स्थलांतराच्या वेळेत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या एका ५५ वर्षीय वीरेंद्र सिंग या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित केले असतानाही रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणामुळे त्याच्या नातेवाइकांना याची माहिती न दिल्यामुळे मुलुंडमधील सगळ्या कोविड सेंटर आणि कोरोना रुग्णालयात जाऊन या नातेवाइकांना शोधाशोध करावी लागली, अखेर फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याचे समजले परंतु दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे या रुग्णाचे मेडिक्लेम असतानाही रु ८० हजार त्याच्याकडून घेण्यात आले असे आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केले असून या रुग्णालयाच्या मुजोरपणाच्या आणि रुग्णांकडून अवाढव्य बिल आकारलेमुलुंड : शेखर भोसले 

गेल्या आठवड्यात जनरेटरला लागलेल्या आगीमुळे मुलुंडच्या अपेक्स कोविड रुग्णालयातील रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र स्थलांतरित केलेल्या एका ५५ वर्षाच्या रुग्णाच्या नातेवाइकांना रुग्णालय प्रशासनाने वेळीच माहिती दिली नसल्याचा तसेच उपचाराच्या नावाखाली हे रुग्णालय मोठया प्रमाणात पैसे वसूल करत असल्याचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलुंडचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने या रुग्णालयाची चौकशी सुरु केली असून ही चौकशी पूर्ण होईपर्यंत या रुग्णालयाला नवीन कोरोना रुग्ण दाखल करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे टी वॉर्डचे सहा.आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले.

सोमवार दि १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५-३० च्या सुमारास मुलुंडच्या अपेक्स कोविड रुग्णालयाच्या 
जनरेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. या आगीमुळे रुग्णलयात दाखल असलेल्या ३९ कोविड रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले होते. या स्थलांतराच्या वेळेत एका रुग्णाचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या एका ५५ वर्षीय वीरेंद्र सिंग या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात स्थलांतरित केले असतानाही रुग्णालय प्रशासनाने हलगर्जीपणामुळे त्याच्या नातेवाइकांना याची माहिती न दिल्यामुळे मुलुंडमधील सगळ्या कोविड सेंटर आणि कोरोना रुग्णालयात जाऊन या नातेवाइकांना शोधाशोध करावी लागली, अखेर फोर्टिस रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आल्याचे समजले परंतु दुसऱ्या दिवशी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे या रुग्णाचे मेडिक्लेम असतानाही रु ८० हजार त्याच्याकडून घेण्यात आले असे आरोप आमदार मिहीर कोटेचा यांनी केले असून या रुग्णालयाच्या मुजोरपणाच्या आणि रुग्णांकडून अवाढव्य बिल आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या सहा महिन्यात आल्या असून अपेक्स रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे एक पत्र पालिकेला देण्यात आले आहे त्यानुसार पालिकेने या रुग्णालयावर निर्बंध लावले असून नवीन कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई केली आहे. पूर्वी दाखल झालेल्या रुग्णांवरच सध्या येथे उपचार चालू असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले.  जात असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या सहा महिन्यात आल्या असून अपेक्स रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे एक पत्र पालिकेला देण्यात आले आहे त्यानुसार पालिकेने या रुग्णालयावर निर्बंध लावले असून नवीन कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई केली आहे. पूर्वी दाखल झालेल्या रुग्णांवरच सध्या येथे उपचार चालू असल्याचे आमदार मिहीर कोटेचा यांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट