गोंडपीपरी तालुक्यात रेती तस्करांची रणधुमाळी

पडित शेत शिवारात अवैध रेती साठा महसुल विभागाची कारवाई संशयास्पद!

गोंडपीपरी : चंद्रपूर जिल्ह्यात रेती घाटाचे अद्याप लिलाव झाले नसल्याने , रेतीतस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे,  नदी घाटावर  सोयीस्कर रस्ते करून रेतीची तस्करी जोमात सुरू  करत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.रोजरासपणे शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन करण्यात येत  आहे ,
येनबोथला नदी घाटा लगत  शेकडो ब्रास रेतीचा साठा आढळून आल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाल्या ,  महसुल विभागा कडून रेतीचा साठा जप्त सुद्धा करण्यात आला. काही दिवसांपूर्वी येनबोथला  घाटालगत अवैध रेती साठा सापडल्यानंतर आता विठ्ठलवाडा  येथील एका शेतकऱ्यांच्या पडीत  शेत जमिनीवर   रेतीचा   साठा  आढळून आला आहे. त्यामुळे येनबोथला विट्ठलवाडा परिसरात परत रेती तस्करी जोमात सुरू झाली आहे. या परिसरात रेती तस्करी होत असल्याची माहिती होताच, महसुल विभागाने या परिसरात रात्रौ च्या सुमारास गस्त वाढवली आहे.महसुल विभागाचे कर्मचारी गस्तीवर असतानाच विठ्ठलवाडा मार्गावर रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टर पकडन्यात  आल्याची चर्चा  केली जात आहे.

पण एकाच ट्रॅक्टरवर कारवाई करुन 
एक लाख दहा हजार नऊशे रुपयांचा दंड  ट्रॅक्टर मालकांना थोटावण्यात  आला व  दुसऱ्या ट्रॅक्टर ची थातूरमातूर  चौकशी करून आर्थिक देवाणघेवाण करून सोडण्यात आल्याची चर्चा रंगू लागली आहे.  यात संबधीत महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपले खिस्से   चांगलेस गरम केल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आहे.

सदर दुसया ट्रॅक्टर मालकाकडून दंडात्मक रक्कमेच्या निम्मे रक्कम एटण्यात आल्याच्या  चर्चे ला पेव फुटले आहे. महसुल विभागाचे कर्मचारी रात्रौ च्या सुमारास गस्ती वर  असताना ट्रॅक्टर पकडणे , थातूरमातूर चौकशी करून सदर ट्रॅक्टर मालकाशी संगनमत करून आपले खिस्से चांगलेच गरम करत  असल्याची चर्चा रंगू लागली असतानाच विठ्ठलवाडा येथील एका  पडीत शेत शिवारात आज सकाळच्या सुमारास  रेतीचा साठा  दिसून आल्याने   रेती तस्करानी रेती च्या साठयास  सुरुवात तर  केली नाही ना असा प्रश्न जनसामन्यांना पडला असून महसुल विभागाच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले .

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट