निरागस बालिकांशी कुकर्म करणाऱ्यांना आम्ही शिक्षा देऊ शकत नाही तर मग महात्मा रावण यांचा पुतळा दहन करण्याचे आम्ही ढोंग का करतो ? भिम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचा जाहीर सवाल.

मुंबई(प्रतिनिधी)२५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात दसऱ्याचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडेल आणि त्याचबरोबर रावण पुतळ्याचेही दहन जागोजागी होईल.आम्ही सर्व धर्मियांचा आदर करीत ह्या रावण दहनाचा जाहीर विरोध करीत असल्याचे भिम आर्मी महाराष्ट्र राज्याचे प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.महात्मा रावण ह्यांची भारतात आणि आणि भारता बाहेर अनेक ठिकाणी आणि आदिवासी समाजामध्ये एक आदर्श राजा , एक कर्तव्यदक्ष भाऊ म्हणूनच पूजा केली जाते , त्या समाजाच्या भावनांचा आदर राखत आपण रावण दहन ह्या प्रथेला कायमचेच बंद केले पाहिजे असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी म्हंटले आहे.

पुराणानुसार आणि एका विशिष्ट धार्मिक मान्यतेनुसार महात्मा रावण हे स्वतः प्रकांड पंडित होते , ते ज्ञान उपासक होते , ते बलवान आणि महाशक्तिशाली राजा होते.न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष राजा म्हणूनच महात्मा रावण यांचा पुराणांमध्ये  गौरव करण्यात आला आहे.रावण ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा महात्मा असाच होतो.अश्या महात्मा रावण यांच्या राज्यात रामपत्नी सीता देखील कैक वर्ष सुरक्षित राहिली आणि आज आपल्या देशात मात्र ५ - ५ वर्षांच्या निरागस ,अबोल मुलींवर सुद्धा पाशवीपणे अत्याचार होत आहे , कुकर्म होत आहे.काळानुरूप आपल्या देशातील अनेक कुप्रथा बंद झाल्या असून सती प्रथा , बालविवाह प्रथा असल्या अनिष्ठ प्रथा कायद्याने केव्हाच बंद झाल्या असून रावण दहनाची ही कुप्रथा सुद्धा आपल्या भारतीय समाजाने कायमची बंद करावी असे जाहीर आवाहन भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केले आहे.

ह्या देशातील अवघ्या ५ वर्षाच्या निरागस बालिकेवर करण्यात आलेल्या कुकर्मांना , ते कुकर्म करणाऱ्या नीच विकृत वासनांधांना आम्ही योग्य ती शिक्षा देऊ शकत नसू , त्यांच्यातील विकृतीला आम्ही भरचौकात जाळू शकत नसू तर मग दरवर्षी रावण पुतळा जाळण्याचा ढोंगीपणा आम्ही का करीत आहोत असा सणसणीत सवाल भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी उपस्थित करून , भिम आर्मीने रावण दहनाला विरोध केला आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट