मुख्य सचिव संजय कुमार यांनी उपनिबंधक-सहकारी संस्था,वसई यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी

विरार (दीपक शिरवडकर)- सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था कामकाज संहिता भारताचे संविधान ९७ वी सुधारणा व महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम,२०१३ अन्वये, सहकारी गृहनिर्माण संस्था उपविधी अस्तित्वात असून त्यानुसारच हौसिंग सोसायटयांचा कारभार चालावा असे शासन धोरण आहे. परंतु या धोरणाचे उपनिबंधक, सहकारी संस्था, वसई कार्यालयाकडून तीन-तेरा वाजविले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या गंभीर प्रकरणाची राज्याचे मुख्य सचिव मा.संजय कुमार यांनी दखल घ्यावी,आणि सदर कार्यालयातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी चर्चा विरारकरांमध्ये होताना दिसते.

सहकार कायदा,नियम व उपविधी आणि शासनपरिपत्रके बासनात बांधून उपनिबंधक-सहकारी संस्था, वसई कार्यालयाचा कारभार हाकला जाऊन खोटया-बोगस कागदपत्राने इमारतीचे बांधकामच अस्तित्वात नसलेल्या जागेत, अवैध ठिकाणी गृहनिर्माण संस्था नोंद करून देण्याचे  प्रताप सन २०१३ पासून केले जात आहेत. गाव मौजे नारंगी, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील सर्वे क्रमांक १८४ (जुना ४०) हिस्सा क्रमांक ८ याठिकाणी इमारत अस्तित्वात नसताना तत्कालिन उपनिबंधक बंजरग जाधव यांनी नोंदणी क्रमांक TNH-VSI-HSG-(TC)-27092-2015 ही हौसिंग सोसायटी नोंद करून दिली.तसेच जेथे हौसिंग सोसायटी नोंदच नव्हती अशा जागेत निवडणूक अधिकारी सहकार सल्लागार भूषण मोरे यांची नेमणुक करीत दि.६/११/२०१६ रोजी निवडणूक कायदा धाब्यावर बसून बेकायदापणे कार्यकारी मंडळ निवडण्याचे प्रताप केले.तर तत्कालीन उपनिबंधक प्रियंका गाडिलकर यांनी त्याच क्रमांकाने दुसऱ्या हिस्सा क्रमांकावरील जागेत कागदपत्राची सक्षमपणे सत्यता न तपासता,अवैधपणे हौसिंग सोसायटी सन २०१९ मध्ये नोंद करून दिली आहे.याविरोधात तक्रारदारांनी सन २०१५ पासून अगिणत तक्रार अर्ज दिले, परंतु प्रशासनाला ते अडचणीचे वाटल्याने मनमानी करत कार्यालयीन स्तरावरून असे तक्रारअर्ज निकालात काढले गेले व खोटया दस्ताने नोंदित हौसिंग सोसायटीला पाठिशी घालण्याचे काम होत आहे.तसेच अन्यत्र ठिकाणच्या हिस्सा क्रमांकाठिकाणी कामात बेजबाबदारपणा व हलगर्जीपणा दाखवत खोटया दस्ताने हौसिंग सोसायटया नोंद केल्या आहेत.तर विद्यमान उपनिबंधक योगेश देसाई यांना याची माहिती मिळूनही ते अशा बेकायदापणास अभय देताना दिसतात.यामुळे बोगसपणे नोंद असणाऱ्या हौसिंग सोसायटयांकडून सदनिकाधारक वित्तीय संस्था, पालघर डिस्ट्रिक फेडरेशन पंतप्रधान आवास अनुदान योजना व अन्य आस्थापनांची फसवणूक होत आहे.हौसिंग सोसायटयांच्या नस्ती गहाळ करणे,गायब करणे याबाबतही या कार्यालयात बराच घोळ असल्याचे जाणकारांचे म्हणणेआहे. अशी माहिती सूत्रांनी दिली.

तक्रारदाराकडून अनेक तक्रारअर्ज दाखल होवूनही,प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना उपनिबंधक, सहकारी संस्था,वसई यांच्याकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही.व बोगसरित्या नोंदित हौसिंग सोसायटयांना अभय दिले जाते.सदर प्रकरणाची मुख्य सचिव मा.संजय कुमार यांनी सक्षम तपास यंत्रणेकडून उच्चस्तरिय चौकशी करून  शासकीय कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि सर्वसामान्य सदनिकाधारकांची होत असलेली फसवणूक थांबवावी अशी मागणी जोर धरत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट