फाईट फॉर राईट फाउंडेशनच्या वतीने कळंबोली येथील हायवेब्रीज खाली राहणाऱ्या कुटुंबाना अन्नदान करण्यात आले.

नवी मुंबई :लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रातील विविध भागात काम करणारे परप्रांतीय आप आपल्या गावी निघून गेले होते. आता हळू हळू लॉकडाऊन संपला आहे आणि कोरोनाचे संकट सुद्धा ओसरत असताना, पोटा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी साठी विविध प्रांतातून अनेक कुटुंब पुन्हा मुंबई व नवी मुंबई भागात कामासाठी परतत आहेत. परंतु त्यांना हाताला काम मिळत नाही व राहण्यासाठी छप्पर सुद्धा मिळत नाही त्यामुळे अश्या अनेक कुटुंबानी कळंबोली येथील हायवे उड्डाण पुलाखाली आसरा घेतला आहे. पण अद्याप काहीही काम मिळाले नसल्याने या कुटूंबाची उपासमार होत असल्याची बातमी कळताच फाईट फॉर राईट फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजीवन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली खालापूर तालुका प्रमुख राजेश खटावले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ह्या कुटूंबाची जेवणाची सोय करीत त्यांना त्वरित अन्नदान केले. सामाजिक सेवेची जाण ठेवत त्यांनी केलेल्या ह्या कृत्याचा कळंबोली व रायगड भागातील नागरिकां कडून फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष￰ विनोद घोलप, योगेश केणी (महाराष्ट्र/अध्यक्ष), सचिव मंथन पाटील, संजीवन पाटील  (रायगड जिल्हा अध्यक्ष ) राजेश खटावले (खालापूर तालुका प्रमुख) आणि सहकाऱ्यांचे कौतुक केले जात

संबंधित पोस्ट