कामगार कायद्यातील बदलाबाबत हिंद मजदूर सभेतर्फे सुप्रियाताई सुळेना निवेदन

मुंबई : दि,२०ऑक्टोबर: हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष साथी शंकर साळवी व सरचिटणीस साथी संजय वढावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार मा. सुप्रियाताई  सुळे यांची भेट घेऊन कामगार कायद्यातील बदल व सरकारी उद्योगांचे खाजगीकरण याविषयी निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे  सरचिटणस साथी संजय  वढावकर यांनी सांगितले की,  कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने नुकतेच लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन कामगार विरोधी  बिल पास केले आहेत. या कोड बिलामुळे कायम कामगारांच्या नोकऱ्या संपुष्टात येणार असून उद्योगातही अशांतता पसरणार आहे,  त्यामुळे आता जरी कायद्याला विरोध करून कायदे मागे घेता येत नसले,  तरी कायद्याचे नियम बनवताना महाराष्ट्र सरकारने कामगार हिताच्या तरतुदी कायम ठेवून  त्याप्रमाणे नियम बनवावेत.  महाराष्ट्र हिंद मजदूर 

अध्यक्ष शंकर साळवी यांनीसांगितले की,  कामगार चळवळीने दीडशे वर्ष अत्यंत संघर्षाने मिळविलेले ४४ कामगार कायद्यांचे चार कोड बिलामध्ये रूपांतर केले आहे, त्यामुळे उद्योगपतींना हायर अँड फायर पॉलिसी अवलंबता येणार आहे, तसेच त्यांनी असे सांगितले की,  एसटी कामगारांना दोन महिन्याचे वेतन मिळालेले नाही,  आपण महाराष्ट्र सरकारकडे प्रयत्न करून या सणासुदीच्या काळामध्ये कामगारांना वेतन मिळवून द्यावे.

हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष साथी शशांक राव यांनी बेस्ट कामगार,  फेरीवाले,  मुन्सिपल कामगार इत्यादींचे प्रश्न उपस्थित करून या घटकासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करावी असे सांगितले.खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अशी बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.

गोदी कामगार नेते साथी सुधाकर अपराज व  केरसी पारेख यांनी मेजर पोर्ट अथोरिटी बिल २०२०, मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या खाजगीकरण, वेतन कराराची थकबाकी इत्यादी विषयांची चर्चा केली. याप्रसंगी महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे पदाधिकारी निवृत्ती धुमाळ, कल्पना देसाई, संज्योत वढावकर, त्रिशिला कांबळे, रमाकांत बने, प्रदीप शिंदे उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट