मुरुड जंजिरा एस टी स्थानक इमारतीची दुरवस्था

मुरुड : निसर्ग चक्रीवादळनंतर अॉगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने मुरुड एस.टी स्थानक इमारतीची पूर्णपणे दुरवस्था झाली असून इमारतीच्या दुरुस्तीची मागणी नागरिक व प्रवासी वर्ग करत आहे. अतितीव्र अशा स्वरूपात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे एस टी स्थानक इमारतीचे पत्रे उडाले असून आतील साहित्य भिजून निकामी झाले आहे. मागील कालखंडात या इमारतीच्या भिंतीना देखील मोठ्याप्रमाणात तडे गेलेले आहेत. शिवाय एस. टी स्थानकातील शैचालये देखील पूर्णपणे निकामी झालेली आहेत.

मुरुड जंजिरा हे पर्यटन स्थळ असल्याने येथे प्रवाशांची मोठ्याप्रमाणावर येजा असते. इमारतीच्या झालेल्या दुरावस्तेमूळे प्रवासी वर्ग पूर्णपणे त्रस्थ झाला आहे. शिवाय दुरावस्तेमूळे वेळप्रसंगी तडे गेलेली एखादी भिंत पडून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन तसेच सुरू असलेली संचारबंदी त्यात निसर्ग चक्रीवादळ या सर्व परिसथितीतून सावरत नुकतीच एस. टी सेवा सुरू झालेले आहे. मात्र मुरुड एस टी स्थानक इमारतीच्या दुरावस्तेमुळे प्रवाशांना बसणे निवारा घेणे अवघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वर्गाने याकडे लक्ष वेधून लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करावी अशी येथील प्रवाशी व नागरिक वर्गाची मागणी जोर धरू लागली आहे.

संबंधित पोस्ट