यशोमती ठाकूर यांनी राजीनाम्याच्या मागणीवर भाजपला दिलं प्रत्युत्तर
यशोमती ठाकूर यांनी राजीनाम्याच्या मागणीवर भाजपला दिलं प्रत्युत्तर
- by Adarsh Maharashtra
- Oct 15, 2020
- 947 views
मुंबई,१५ ऑक्टोबर : काँग्रेसच्या आक्रमक नेत्या आणि महिला - बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना न्यायालयाने आठ वर्षं जुन्या प्रकरणात गुरुवारी दोषी ठरवलं. त्यांना तीन महिने तुरुंगवास आणि १५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ठाकूर यांची जामिनावर सुटका झाली आहे. पण भाजपने यावर यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर यशोमती ठाकूर यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
'न्यायालयीन प्रक्रियेचा मी सदैव आदर केला आहे. मी स्वत: वकील आहे. त्यामुळे या प्रकरणावर मी फार भाष्य करणं योग्य नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या क्षणी मी इतकंच सांगू शकते की शेवटी विजय सत्याचा होईल', असं यशोमती ठाकूर निकालानंतर म्हणाल्या.
भाजपने केलेल्या राजीनामा देण्याच्या मागणीबाबत त्या म्हणाल्या, 'एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल. त्यांना इतकंच काम आहे. भाजप सोबत माझी वैचारिक लढाई आहे आणि मला राजकीय आयुष्यातून संपवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, पण मी माघार घेणार नाही. भाजपशी माझी लढाई सुरूच राहील.'
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम