कळवण-सुरगाणा तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या,निधीसाठी उपमुख्यमंत्र्यांकडे घेणार बैठक- राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे

मुंबई दि.१३ : कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील सतखांब, वांगण आणि लाडगाव या प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देण्याबाबत उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन मृद व जलसंधारण राज्यमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी दिले.

श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कळवण-सुरगाणा तालुक्यातील साठवण तलाव व को.प.बंधारे या योजनांबाबत मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यमंत्री श्री. भरणे म्हणाले, कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेतील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या प्रकल्पांसाठी आदिवासी विकास विभागाकडून निधी प्राप्त व्हावा यासाठी आदिवासी विकास मंत्री आणि राज्यमंत्री, जलसंधारण आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव यांची संयुक्त बैठक उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेणार असल्याचे माहिती त्यांनी दिली. तसेच तालुक्यातील उर्वरीत 10 लघु पाटबंधारे प्रकल्पांचे अंदाज पत्रक सादर करण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले.

आदिवासी क्षेत्राच्या सिंचन विकासाच्या योजनांसाठी जलसंधारणासह आदिवासी विकास विभागानेही निधी उपलब्ध करुन दिल्यास आगामी काळात क्रांती होईल, अशी भावना श्री. भरणे यांनी व्यक्त केली.

या बैठकीला आमदार ए.टी. पवार, प्रधान सचिव नंदकुमार, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी व्ही. देवराज, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वि.क नाथ, जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रविण खेडकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट