एस आणि टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना नगरसेविका दिपमाला बढे यांनी भरला अर्ज

मुलुंड :(शेखर भोसले) पालिकेच्या एस आणि टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी प्रभाग क्र ११३ च्या शिवसेना नगरसेविका दिपमाला बढे यांनी सोमवार दि १२ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज पालिकेच्या टी वॉर्ड कार्यालयातील चिटणीसांकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सादर केला. या अर्जावर भांडुप पश्चिम येथील शिवसेनेच्या नगरसेविका दिपाली गोसावी यांनी सूचक म्हणून सही केली असून कांजूरमार्ग येथील शिवसेनेच्या नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी त्यांना अनुमोदन दिले आहे. यावेळी शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगावकर, एस वार्डातील शिवसेनेचे नगरसेवक, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक तसेच युवासैनिक उपस्थित होते. 

एस वार्डात एकूण १४ नगरसेवक असून तर टी वार्डात एकूण ६ नगरसेवक आहेत. असे एकूण २० नगरसेवक मिळून या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची हे ठरवणार असून येत्या १६ तारखेला मुंबई महानगर पालिकेच्या मुख्य कार्यालयात ही निवडणूक होणार आहे. भाजपाच्या जागृती पाटील यांनी याआधीच अर्ज भरला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाचे मिळून १० नगरसेवक असून भाजपाकडेही १० नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने एस आणि टी वार्डाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी एकंदरीत    तुल्यबळ लढत होणार असल्याचे अंदांज जाणकार वर्तवित आहेत. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट