लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख पदी प्रमोद तरळ यांची नियुक्ती
- by Adarsh Maharashtra
- Oct 13, 2020
- 943 views
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील तिवरे गावचे सुपुत्र, मुंबई विलेपार्ले येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते व एस.ई. ओ ( महाराष्ट्र शासन ) प्रमोद तरळ यांची लोकस्वराज्य फिल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन भारत या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
पत्रकारिता, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली २२ हून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या तरळ यांना त्यांच्या कार्याबद्दल ४५ पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आपल्या निर्भिड , ज्वलंत लेखणीतून तळागाळातील लोकांच्या समस्या वॄत्त पत्राद्वारे शासनदरबारी पोहचवून त्या सोडविण्यावर नेहमीच भर असतो त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदान पाहून त्यांची महाराष्ट्र शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे . आपल्या युवा महाराष्ट्र सामाजिक मंच या संस्थेच्या माध्यमातून गरीब मुलांना आर्थिक मदत मिळवून देणे. विविध स्पर्धाद्धारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे त्याशिवाय शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ते जनजागृतीचे काम करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या समस्यां सोडविण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असल्याने त्याचा फायदा संघटनेला होईल असे बोलले जात आहे. प्रमोद तरळ हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम