शिवसेना नगरसेविका उर्मिला पांचाळ यांची महिला आणि बालविकास समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई (प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक - २०० च्या शिवसेना नगरसेविका, सौ. उर्मिला उल्हास पांचाळ यांची " महिला व बालविकास  समितीच्या उपाध्यक्षा " पदी नियुक्ती झाली. पांचाळ यांनी या आधीही हे पद भूषवले असून त्यांचा या विषयावर सखोल अभ्यास आहे. त्यांनी आपल्या प्रभागात गरजू नागरिकांना घरघंटी, शिवणयंत्र आणि विविध लघुउद्योग करण्या साठी लागणारे साहित्य या विभागा मार्फत लोकांना उपलब्ध करून दिले आहे. सध्या कोरोनामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले असून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही या विभागामार्फत मशीन आणि लघुउद्योग उपलब्ध करून देणार आहोत. यातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उपयोग होईल अशी माहिती नगरसेविका उर्मिला पांचाळ यांनी दिली.

संबंधित पोस्ट