जलकुंभाची नियमित सफाई बंधनकारक करा-राष्ट्रवादीची मागणी .
- by Rameshwar Gawai
- Oct 06, 2020
- 641 views
बदलापूर(प्रतिनिधी) : नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नियमितपणे जलकुंभांची सफाई करणे बंधंनकारक करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांनी पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शेकडो जलकुंभ उभारले आहेत. मात्र या जलकुंभांची नियमितपणे साफसफाई होत नसल्याने अनेकदा गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी येत असतात. दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांना अनेक जलजन्य आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून वर्षातून एकदा तरी पाण्याच्या जलकुंभांची साफसफाई करणे बंधनकारक करावे, अशी मागणी आपण पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे केली असल्याचे हेमंत रुमणे यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम