मराठा समाजातील तरुणांना आशावादी राहा आत्महत्या करू नका- भाई जयंत पाटील.

मुंबई :मराठा आरक्षणासाठी अगदी अनेक मोर्चे अनेक आंदोलने झाले यामध्ये अनेक मराठा समाजाच्या युवकांना प्राण गमवावा लागला

शहीद विवेक रहाडे याच्यासह मराठा तरुणांचे  बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी दिली आहे

शहीद विवेक रहाडे या बीड मधील तरूणाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आत्महत्या केली यामुळे मी खूप दुःखी झालो आहे .विवेक राहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले.त्यांच्या परिवारा सोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू!  यांचा मला विश्वास आहे.हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही. जो पर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत शेतकरी कामगार पक्ष सरकार दरबारी पाठव पुरावा करीत राहील. आरक्षणाच्या मुद्द्यावर  शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या आदेशावरून पक्षाचे सर्व कार्यकर्ते आरक्षणाच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन आरक्षणाच्या लढाणार आसल्याची माहिती शेकापचे राज्य मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धीपत्रकात दिले आहे,

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट