उत्सव अग्रीमची मर्यादा वाढविण्याची राज्य चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची मागणी

मुंबईवाढती महागाई, वेतन आयोगाप्रमाणे झालेली वाढ आणि सध्याच्या काळातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेता राज्य सरकारने यंदा उत्सव अग्रीमची मर्यादा १२ हजार ५०० रुपयांवरून २० हजार रुपये इतकी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांनी केली आहे. याबाबत राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी लेखी निवेदन वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना दिले आहे. यात त्यांनी ही रक्कम परत सरकारला मिळणार असल्यामुळे त्याची मर्याद वाढविण्यास काहीही हरकत नसावी, असे नमूद केले आहे. दसरा आणि दिवाळीचे सण जवळ आले असून याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट