विजया वाड यांच्या गोष्टी घ्या गोष्टी चे जगभरातील साहित्यिकांकडून सादरीकरण
- by Adarsh Maharashtra
- Sep 29, 2020
- 392 views
मुंबई:'गोष्टी घ्या गोष्टी’ ही संकल्पना घेऊन विजया वाड यांनी देश-विदेशातल्या गोष्टी वेल्हाळ लोकांना एकत्र आणले आहे. डॉ. निशिगंधा वाड आईच्या पाठीशी निर्मात्या म्हणून उभ्या आहेत. शीर्ष गायले आहे नितांशू सावंत आणि मानसी जोशी यांनी. भारतातून डॉ. विजया वाड, `श्वास’च्या विश्वविख्यात लेखिका माधवी घारपुरे, शिक्षणतज्ञ डॉ. विणा सानेकर, विख्यात लेखिका माधवी कुंटे, नाटककार भास्कर मयेकर, कथाकार गुरूनाथ तेंडुलकर आणि रवी राजमाने तर परदेशातून म्हणजे अमेरिकेतून डॉ. प्राजक्ता, डॉ. अभिजीत देशपांडे, डॉ. रवी गोडसे, डॉ. अरुंधती दाते, कॅनडातून मंजिरी शेंडे हे सुरूवातीची बिनीचे शिलेदार आहेत. डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. रविन थत्ते २ ऑक्टोबरला याचे उद्घाटन ऑनलाईन करतील. दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होत असून गोष्टी घ्या गोष्टी त जगभरातील गोष्टीप्रेमी सामील होतील आणि यू ट्युब चॅनेल गोष्टींनी समृद्ध करतील, असा विश्वास साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम