गुजरातकडे जाणारे पाणी दुष्काळी भागास देणार......
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1046 views
नाशिक : नाशिकसह नगरच्या वळण बंधाऱ्यांचे काम मार्गी लावण्यास प्राधान्य देण्यात येत असून काही प्रकल्पांना वळण बंधारे म्हणून जाहीर करण्यात आले आहे. लहान प्रकल्प लवकर पूर्ण केले जातील. गुजरातमधील समुद्रात वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडय़ाच्या दिशेने वळवून ते दुष्काळी भागास दिले जाईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास राष्ट्रवादीचा विरोध आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला जलसंपदा, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक जलसंपदामंत्री पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येथे झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सिंचन प्रकल्पांचा आढावा घेऊन गुजरातमध्ये समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्याच्या दृष्टिकोनातून काम केले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीत कोणतीही गटबाजी नाही. नाराजीदेखील नाही. केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना राष्ट्रवादीचा विरोध आहे. ही विधेयके मंजूर करत भा.ज.पा.ने शेतकरीविरोधी भूमिका घेतली असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेतली आहे. आता प्रत्येक कुटुंबाने पुढाकार घेऊन जबाबदारी स्वीकारावी. गावांनी करोनामुक्त गाव करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम