लवकरच कोरोना रुग्णांसाठी मुलुंडमध्ये आणखी २० आयसीयू बेड उपलब्ध होणार
- by Adarsh Maharashtra
- Sep 13, 2020
- 504 views
मुलुंड :(शेखर भोसले) मुलुंड पश्चिम येथील रिचर्डसन अँड क्रुडास येथे २० बेडच्या आयसीयू सेंटरचे काम प्रगतीपदा असून येत्या ४ ते ५ दिवसांत हे काम सिडकोतर्फे पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. सिडकोचे काम पूर्ण होताच पालिकेला हे सेंटर हस्तान्तरित केले जाणार असल्याने पुढील सात दिवसांत येथे बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिन्यात ५० हून कमी बेड असलेले ७२ खासगी नर्सिंग होम व रुग्णालयांना कोविड उपचार करण्यास मनाई केल्याने मुलुंआयसीयूड मध्ये सध्यातरी फक्त मिठागर येथील ८ आयसीयू बेडच उपलब्ध होते परंतु ते देखील भरलेले असल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या कोविड रुग्णांना आयसीयू बेडसाठी सध्यातरी मुलुंड बाहेर जावे लागत आहे. परंतु येत्या आठवड्याभरात रिचर्डसन
अँड क्रुडास कोविड उपचार केंद्रात २० आयसीयू बेडस उपलब्ध होणार असल्याने मुलुंडकरांना आयसीयू बेडसाठी मुलुंडबाहेर जाण्याची आवश्यकता लागणार नाही आहे, असे येथील डॉ उमेश पाटकर यांनी सांगितले.
कोरोनाचा फैलाव वाढल्याने मुलुंड पश्चिमच्या रिचर्डसन अँड क्रुडास कोविड उपचार केंद्रातील रुग्ण संख्या ५९२ पर्यंत पोहचली आहे तर मुलुंड पूर्वच्या मिठागर रोड कोविड उपचार केंद्रातील रुग्ण संख्येने २०० चा टप्पा ओलांडला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम