उत्तर भारतीय ज्योतिया माँ सणांला प्रशासनाच्या पायघड्या!
- by Adarsh Maharashtra
- Sep 13, 2020
- 1252 views
मुंबई (जीवन तांबे) कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य सरकारने सर्व सण-उत्सव निर्बंध लादले आहेत. त्यामुळे यंदाचे सर्व सण-उत्सव भक्तांनी घरीच राहून साजरे केल्याचे दिसले त्यातच महाराष्ट्रात झालेल्या डॉ.आंबेडकर जयंती, शिव जयंती महाराष्ट्र दिन, आषाढी एकादशी, गोपाळकाला व आताच्या गणेशचतुर्थी यावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर निर्बंध लादले व पोलिसांचा बंदोबस्त देखील ठिकठिकाणी दिसत होते त्यामुळे कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने काळजी घेतलेली दिसली.
त्यामुळे नागरिकांनी देखील प्रशासनाला पूर्ण पणे सहकार्य केले. त्यातच ता. 10 सप्टेंबर रोजी झालेल्या ज्योतिया माँ या सणाकडे पालिका व पोलिस प्रशासनाने मात्र उत्तर भारतीय सणा पुढे पायघड्या घातल्याचे पहायला मिळाले. ऊत्तर भारतीय बांधवांचा 10 सप्टेंबर ला झालेल्या ज्योतिया माँ या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर भारतीय स्त्रिया आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात आणि आरोग्यासाठी शुभेच्छा देतात.ज्योतिया माँ व्रताप्रमाणे स्वच्छ ठेवले जाते म्हणून ज्योतिया माँ उपवास सर्वात कठीण व्रत केला जातो. हा सण समुद्र, तलाव या किनाऱ्याच्या ठिकाणी उत्सव येऊन पूजा अर्चा केली जाते.
परंतु यंदा ज्योतिया माँ हा उत्सवावर देखील कोरोनाचे सावट असल्यामुळे काही उत्तर भारतीय बांधवाने आपल्या घराजवळील पटांगणात उत्सव साजरा केला. विक्रोळीतील उत्तरभारतीयांनी हा उत्सव समुद्र, तलाव या ठिकाणी न करता आपल्या घराजवळील पटांगणात साजरा केला तर दुसरीकडे भांडुप याठिकाणी असलेल्या शिवाजी तलाव येथील उत्तर भारतीय बांधवाने या तलावावर ज्योतिया माँ ही पूजा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सोशल डिस्टनसिंग ची 'ऐशीतैशी' करून टाकली होती. या कडे पोलीस व पालिकेचे सरर्सपणे दुर्लक्ष झालेलंस दिसत होते.आताच साजरा झालेला सण गणेशोत्सव या सणाला गणपती आगमनापासून ते विसर्जन परेनंत प्रशासनाने नियम आटी लादल्या होत्या आगमना करिता फक्त 5 माणसांना परवानगी देण्यात आली होती.
त्याच गणपती बाप्पा विसर्जन दिवशी देखील तलाव, समुद्र ठिकाणी कुठल्याच भक्तांना त्याठिकाणी जाण्यास पूर्णपणे बंदी होती व पोलिसांचा मोठा फ़ौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता त्यामुळे काल झालेल्या ज्योतिया माँ सणासाठी अशी कुठलेच नियम आटी दिसून आल्या नाहीत.त्यामुळे आता महाराष्ट्रातील सणांबाबत दुजाभाव केला जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम