दिलखुलास’ मध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोना : संसर्गाचे स्त्रोत व विविध चाचण्या’ या विषयावर मुलाखत
- by Adarsh Maharashtra
- Sep 03, 2020
- 899 views
मुंबई दि.3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘कोरोनाशी दोन हात’ या संवादातील पहिला भाग ‘कोरोना: संसर्गाचे स्त्रोत व विविध चाचण्या’ या विषयावर मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर व न्यूज ऑन एअर या ॲपवर शुक्रवार दिनांक 4 व शनिवार दि.5 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकता येईल.ज्येष्ठ समाजसेवक शांतीलाल मुथ्था यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाची सद्य:स्थिती, बाधित व अॅक्टिव रुग्ण, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण, मृत्यूदर कमी करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न, हर्ड इम्युनिटी, सिरो सर्वेक्षण म्हणजे काय, ज्यांना लक्षण नाहीत ते लोकं इतरांना हा संसर्ग देऊ शकतात का, अॅंटीजीन टेस्ट, आरटीपीसीआर टेस्ट, अॅंटीबॉडी टेस्ट यामधील फरक,कोरोना चाचण्या करण्यासाठी शासनाच्या व्यवस्था या संदर्भात सविस्तर माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘दिलखुलास’ मध्ये दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम