आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात

मुंबई, २४ ऑगस्ट :आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ११०१५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन १४२१९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण ५०२४९० रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २६८१२६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ७२.४७% झाले आहे.

आज राज्यात ११ हजार ०१५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आत्तापर्यंत राज्यातील एकूण करोना रुग्णांची संख्या ६ लाख ९३ हजार ३९८ इतकी झाली आहे. तर, राज्यात सध्या १ लाख ६८ हजार १२६ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ चाचण्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३६ लाख ६३ हजार ४८८ नमुन्यांपैकी ६ लाख ९३ हजार ३९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.९२ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ४४ हजार ०२४ लोक होम क्वारंटाईन मध्ये आहेत. सध्या ३३ हजार ९२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. राज्यात आज २१२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२४ टक्के एवढा आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट