चराऊ कुरणं मेंढपाळांना मुक्त करून, चराऊ कुरणांचा आटपाडी पॅटर्न महाराष्ट्रभर लागु करा....

मेंढपाळपुत्र आर्मी आक्रमक: मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार ;आटपाडी तहसीलदार यांना दिले निवेदन..

आटपाडी(प्रतिनिधी)मेंढपाळांना महाराष्ट्र भर वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे तसेच महाराष्ट्रातील मेंढपाळ हा भटकंती करत आपली उपजीविका करत असल्याने,भटकंतीमध्ये अनेक हाल अपेष्ठांना तोंड द्यावे लागते. त्यांना शासना कडून कोणतीच योजना मिळत नसल्याची खंत मेंढपाळपुत्रांनी बोलुन दाखिवली आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणुन मेंढपाळांकडे पाहिले जाते परंतु आज कणाच नेस्तनाबूत होताना दिसत आहे मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसीलदार व वनक्षेत्रपाल रोहयो यांना  मेंढपाळ पुत्र आर्मी चर्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात साधारणतः या २० मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील सर्व कुरणे व गायराण विकसित आणि मुक्त करून मेंढपाळांच्या नावे ७/१२ करावेत, महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळांमधून सुरक्षा कवच देण्यात यावे,

सुरक्षा किट मध्ये या गोष्टीचा सामावेश करावा.

 (मेंढर कातरायची मशिन,फोल्ड करायचा तंबु, कुर्हाड, घोंगडी, टाॅर्च लाईट,मेंढ्या पाठी मागे वापरायच्या चपल्या बंदुक)महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मेंढ्या आडरानात आजारी पडल्यास दवाखाना उपलब्ध नसतो तर यासाठी पशु अॅब्युल्नस सुरू करावी महाराष्ट्रातील मेंढपाळांना फिरते रेशनकार्ड देण्यात यावे,मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्यास शासनाने मेंढ्याचे पंचनामे करून मेंढपाळांना मेंढ्याचा विमा देण्यात यावा किंवा महामंडळातुन मेंढ्या देण्यात यावा महाराष्ट्रातील मेंढपाळांचा मेंढ्यांच्या मागे मृत्यू झाल्यास पुण्य अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळातुन त्या मेंढपाळाला मेंढपाळ नेते कै बबनराव थोरात यांच्या नावाने पाच लाख रुपये देऊन विशेष अर्थ सहाय्य करावे,महाराष्ट्रातील मेंढपाळ वर्ष भर भटकंती करणारा समुदाय आहे त्यांची मुलं शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत कारण वसतीगृहात त्यांना जागा खुप कमी असतात त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळांच्या मुलांना स्वतंत्र वसतीगृह करावे व मेंढपाळांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी,महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना  घर बांधण्यासाठी शासनाकडून जमिण देऊन त्यांच्यासाठी अहिल्यादेवी होळकर घरकुल आवास योजनेंतर्गत घरे बांधून द्यावीत महाराष्ट्रातील मेंढपाळांच्यावर हिंसक पशु  गावगुंड हल्ले करतात त्यापासून संरक्षण करण्यासाठी बंदूक  देण्यात यावी महाराष्ट्रातील धनगर समुदायाला STआरक्षण लागु करावे,महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता त्यांच्यासाठी अॅट्राॅसिटी पेक्षा कडक कायदा करण्यात यावा,महाराष्ट्रातील मेंढपाळांची लोकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाने विकत घेऊन मेंढपाळांच्या लोकरीला प्रोत्साहन देण्यात यावे,मेंढपाळांची पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करुन घेतात ती थांबविण्यासाठी मेंढपाळांच्या मेंढ्या चा सर्वे करू मेंढ्यांच्या कळपावरती जाऊन मेंढ्यांना मोफत वैद्यकीय औषधे देण्यात यावीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाला महाराष्ट्र शासनाने त्वरित निधी द्यावा,मेंढपाळांच्या मेंढ्यांना हमीभाव द्यावा. दुष्काळसदृश्य भागात मेंढपाळांना शासनाने महामंडळाच्या माध्यमातून चारा छावण्या  सुरू कराव्यात महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या कलेला वाव देऊन गजीनृत्य/गजीढोल कैपत्ये धनगरी ओव्या सादर करणार्या कलाकरांना शासकीय मानधन देण्यात यावे,महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना मेंढ्या खरेदी करण्यासाठी २० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, गेली ६० वर्ष डुबई कुरणांमध्ये असलेल्या ओढ्यात मेंढ्या पाणी पितात डूबई ओढ्यासह आटपाडी तालुक्यात कुठेही मुक्या जनावरांना पाणी पिण्यास बंधन नसावं,आटपाडी तालुक्यासह महाराष्ट्रभर कुरणे,फाॅरेस्ट इतर शासकीय जमिनीमध्ये ५ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यास बंधन असु नये.

या २० मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र भर उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, तसेच होणार्या नुकसान भरपाई स महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असेही मेंढपाळ पुत्र आर्मी चे संयोजक मा.अर्जुन थोरात बोलताना म्हणाले यावेळी आटपाडी तालुक्यातील मेंढपाळ व मेंढपाळ पुत्र तसेच धनगर ,बहुजन समाजातील बांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट