मुसळधार पावसामुळे पूर्व उपनगरातील सखल भागात पाणी
- by Adarsh Maharashtra
- Aug 05, 2020
- 731 views
मुंबई दि.05 (जीवन तांबे)सलग तीन दिवस धुवाधार बरसणाऱ्या पावसामुळे पूर्व उपनगरातील विविध परिसरांमध्ये पाणी साचले. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली तर काही ठिकाणी थेट घरांमध्ये पाणी शिरले. सायन, चेंबूर, कुर्ला, टिळक नगर, नेहरू नगर, विक्रोळी व मुलुंड परिसरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. सायन येथील गुरुकृपा हॉटेल समोरील रस्ता, कुर्ला पूर्व येथील ठक्कर बाप्पा, कुर्ला सिग्नल, चेंबूरच्या सुमन नगर, उमरशी बाप्पा चौक, सिंधी कॅम्प, पोस्टल कॉलनी, शेल कॉलनी, टिळक नगर या परिसरांमध्ये दिवस भर पाणी साचले होते. मुलुंड परिसरात देखील रहिवाशी वस्त्यांमध्ये पाणी साचले होते. चेंबूरच्या सुमन नगर येथे अनेक बाईक शोरूम तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दुकानात पाणी शिरले. यामुळे दुकानातील कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील विजयनगर वसाहतीत रहिवाशांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. यामुळे रात्रभर नागरिक भीतीच्या वातावरणात होते. तसेच बी. आर. मार्गावरील पाटील चाळ येथे जोरदार वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. मुलुंड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस पाणी साचले होते तसेच भक्तिमार्गावर रात्रीपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे नागरिकांना साठलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागली

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम