पोलीस तारी त्याला कोण मारी! टिळक नगर उड्डाण पुलाखालून वाहून गेलेल्या तरुणाला पोलिसांनी दिले जीवदान!

मुंबई दि,05 (जीवन तांबेमुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत असल्याने  पालिकेच्या आपत्कालीन विभागाने नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आव्हान केले असतानाच देखील टिळक नगर उड्डाण पुलाखालील शांता जोग मार्गावर गुडघाभर साचलेल्या पाण्यातील मॅनहोल मध्ये अडकून पडलेल्या तरुणाला पोलिसांनी बाहेर काढून जीवदान दिले आहे.  

मुंबईत काल पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने चेंबूर व टिळकनगर परिसर संपूर्ण पाण्याने भरून गेला होता. पावसाळ्यात दरवर्षी गुडघाभर पाणी साचत असल्याने नागरिकांना पायाखालची वाट दिसत नसल्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संतोष पवार वय 26 नांवाचा एक तरुण सकाळी ठीक.10 सुमारास अमर महल वरून टिळक नगर उड्डाण पुलाखालून चालत नेहरू नगर कडे जात होता.

या उड्डाणपुला खालील मार्ग खोलगट असल्याने या ठिकाणी मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणातप पाणी साचले होते.

हा संतोष चालत येत असतानाच अचानक त्याचा तोल जाऊन  20 फूट अर्धा उघडे असलेल्या मॅनहोल जाऊन अडकला तो आपला जीव वाचविण्याचा प्रयन्त करीत होता. परन्तु  पाण्याच्या प्रवाहाच्या दबावाने त्याला बाहेर पडणे मुस्किलच होऊन बसले होते.  

इतक्यात या मार्गवरून दक्ष नागरिक जात होते. त्याच्या लक्षात ही घटना येताच त्यांनी टिळक नगर पोलीस ठाण्याला माहिती दिली. लगेच पोलीस कॉस्टबल संजय पवार व सहकारी यांनी घटना स्थळी धाव घेतली आणि त्यांनी लगेच पालिकेला याबाबत माहिती दिली. त्यांनी त्याला स्वत:  पाण्यात उतरून बाहेर काढल्याने या तरुणाला जीवनदान मिळाले आहे.

वाहून जात असलेला तरुण संतोष पवार

यामुळे पोलीस कॉन्स्टेबल संजय पवार यांची सर्वत्र वाहवा होत आहे. 

पोलीस तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती येथे दिसून आली आहे. पवार यांच्या कामाची  दखल मुंबई पोलीस आयुक्तांनी घेऊन त्यांचे धन्यवाद मानले आहे.

 प्रतिक्रिया:संजय पवार पोलीस कॉस्टेबल 

पालिकेने पावसाळ्या पूर्वी सर्व मार्गावरील मॅनहोल वर झाकणे लावली पाहिजेत. नागरिकांनी ही मुसळधार पावसात बाहेर पडू नये. स्वतःची काळजी घ्यावी.

आम्ही तर तुमची काळजी घेतोच

सेवा करणे हे आमचे कर्तव्य समजतो.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट