कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामामुळे काही दिवसातच झाली पदपथाची दुरवस्था

मुलुंड:(शेखर भोसलेमुलुंड पूर्व येथील अरुणोदय नगर मधील अरुणोदय शॉपिंग कॉंप्लेक्सच्या समोरील नव्याने बनविण्यात आलेला पदपथाची दुरवस्था झाली असल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेच्या टी वार्ड मार्फत या पदपथाची दुरुस्ती करण्यात आली. त्यावेळी या पदपथावर अर्ध्या भागात नवीन पेवरब्लॉक्स टाकण्यात आले तर अर्ध्या भागात सिमेंटचा कोबा नव्याने बनविण्यात आला. परंतु हा नव्याने बनविण्यात आलेल्या सिमेंटच्या कोब्याची दुरवस्था झाली असून तेथील सिमेंटचा थर निघून गेला असल्याने त्याखालील रेती सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना तेथून चालताना त्रास होत असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक करत आहेत. अनेक जेष्ठ नागरिक तेथील ओबडधोबड पदपथा मुळे पडले असून जखमी झाले आहे. कामाच्या ठिकाणी निरीक्षण न करणाऱ्या संबंधित पालिका अधिकारी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने या परिसरातील रहिवाशांनी केली आहे. 

या पदपथाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने दुय्यम दर्जाचे सिमेंट वापरले तसेच सिमेंटचा कोबा बनवून झाल्यावर त्याला व्यवस्थित क्युरिंग होवूच दिले नाही. क्युरिंगसाठी
पाण्याचा योग्य वापर न केल्याने हा कोबा काही दिवसातच फुटला असल्याचे काही तज्ञांनी तसेच समोरच्या दुकानदारांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले. टी वार्डच्या पालिका अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देणे टाळले. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट