मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणार्यासह ग्रुप ऍडमिनला पोलिसांचा दणका
- by Adarsh Maharashtra
- Aug 02, 2020
- 857 views
मुंबई :राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हॉटसअपवर व्हायरल करणे एका तरुणासह गुप ऍडमिनला भारी पडले आहे. शिवसैनिकांनी त्या पोस्ट विरोधात आवाज उठविताच भोईवाडा पोलिसांनी त्या पोस्ट करणार्या व्यक्तीसह गुप ऍडमिनला चांगलाच दणका दिला. पून्हा असे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास कठोर कारवाई होईल अशी तंबी पोलिसांनी त्यांना दिली आहे
दादर पूर्वेकडील नायगाव येथे शांती कॅफे मित्र मंडळ नावाचा व्हॉट्सअपवर ग्रुप आहे. त्या ग्रुपवर सुधा मयेकर या माथेफिरूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.
हे समजताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली. पण कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता खासदार राहुल शेवाळे, आमदार, विभागप्रमुख सदा सरवणकर, नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्या सूचनेनुसार उपविभागप्रमुख विलास राणे, उपविभाग समन्वयक प्रशांत घाडीगावकर, शाखाप्रमुख नितीन पेडणेकर व अन्य पदाधिकार्यांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाण्याच्या करिष्ठ निरीक्षकाची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी सुधा मयेकर याला पोलीस ठाण्यात आणून माफीनामा लिहून घेतला. तसेच पुन्हा असे कृत्य केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असे त्याला सांगण्यात आले. शिवाय ग्रुप ऍडमिनला बोलावून तो व्हॉटसअप ग्रुप डिलिट करण्यात आला. सामाजिक तेढ निर्माण होईल किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य कोणी करू नये असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम