कोवीड रुग्णालये, विलगीकरण कक्षांची सुरक्षा यंत्रणा तातडीने मजबूत करा ! प्रत्येक कोवीड सेंटरवर मेडिकल कौन्सिलर आणि मानसोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करा– किरीट सोमैया
- by Adarsh Maharashtra
- Aug 01, 2020
- 1086 views
डोंबिवली : गेल्या काही आठवड्यात राज्यातील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांच्या आत्महत्यांचे जवळजवळ अर्ध्या डझनहून अधिक प्रकार घडले आहेत. याच पार्श्व भूमीववर राज्यातील सर्व कोवीड सेंटरमध्ये पर्मनेंट मेडिकल कौन्सिलर आणि सायक्रॅटिसची नेमणूक झाली पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. डोंबिवलीत तर गेल्या १५ दिवसांत तीन कोवीड रुग्णांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. कोणत्या कारणामुळे हे पेशंट पळून जातात, कसे जातात, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, व्यवस्था मजबूत केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. डोंबिवलीतील तिस-या रुग्णांच्या नातेवाईंकांची सोमैयांनी आज भेट घेतली.
डोंबिवलीत गेल्या १५ दिवसांतील घटना पाहिल्या तर पहिला पेशंट हॉस्पिटलमधून पळून फुटपाथवर मृत्यू पावला, दुस-याने पाचव्या मजल्यावरून उडी मारली. तर तिस-या रुग्णाने खाडीत उडी घेतली, या संपूर्ण प्रकऱणाची चौकशी झाली पाहिजे अशी विनंतीही सौमैया यांनी विष्णूनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठांकडे केली आहे.
अशाच घटना गेल्या काही महिन्यांत घडल्याचे दिसून आले आहे. कांदिवली शताब्दी हॉस्पिटलमधूनही रुग्ण पळून गेला आणि त्याचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिळाला होता, तर सेव्हन हिल्समधून गायब झालेला रुग्ण तर गळफास घेतलेल्या अवस्थेत साप़डला.
या सर्व स्थितीत मूळ मुद्दा हा आहे की, पॉझिटिव्ह रुग्ण हे रुग्णालयाबाहेर जातातच कसे, हे ड़ॉक्टरांच्याही लक्षात येत नाही का? राज्यात कोवीड रुग्णांच्या आत्महत्येच्या आणि गायब होण्याच्या इतक्या घटना घडल्यानंतरही राज्य सरकार काहीच का करत नाही? यांची सुरक्षा यंत्रणा काय करत असते? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम