कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे कल्याण-डोंबिवलीत अग्निशमन दलासह कर्मचाऱ्यांची औषध फौज उतरली रस्त्यावर
- by Adarsh Maharashtra
- Jul 26, 2020
- 1305 views
डोंबिवली (श्रीराम कांदु) कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यातील साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेकडून कल्याण आणि डोंबिवली शहरात धुरावणी आणि औषध फवारणीची विशेष मोहीम रविवारपासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळपासून कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांसह 4 जीप माउंटेड मशीन, 11 ट्रॅक्टर व अग्निशमन दलातील 7 गाड्यांच्या साहाय्याने एकाच वेळी रस्त्यावर धुरवणी व सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करण्यास सुरूवात केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेञात कोरोनाने थैमान घातले असून आतापर्यत 18 हजार 165 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली असून यापैकी आतापर्यत 298 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 718 रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.
एकीकडे कोरोनाचे थैमान तर दुसरीकडे साथीच्या आजाराने डोके वर काढण्या अगोदरच साथरोग फवारणी, डास-मच्छर प्रतिबंधक फवारणी, धुरावणी अशा उपायोजना सर्व प्रभागात राबविण्यात येत आहेत. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ठोस पावले उचलली असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अनेक प्रतिबंधकात्मक उपाययोजना सर्व प्रभाग क्षेञात करून रस्ते, कन्टेंनमेंन्ट झोन, झोपडपट्ट्या परीसर, नागरी संकुले, यामध्ये सॅनिटरायरिंझिंग फवारणी, धुरावणी तसेच अग्निशमन दलामार्फत रस्त्यांवर सोडियम हायपो क्लोराईडने फवारणी करण्यात येत आहे. कोरोना बरोबर साथी रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमेअतंर्गत सर्व यंञणा एकञित आणून कोव्हिड प्रतिबंधक विशेष फवारणी/डास प्रतिबंधक फवारणी करण्याचे आयोजन रविवारपासून सुरु करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण पश्चिम विभागात 2/ब आणि 3/क प्रभागक्षेञात संपूर्ण परिसरात सकाळ 7 ते दुपारी 2 पर्यंत व डोंबिवली पूर्व विभागात फ, ग, आय, ई प्रभाग क्षेञात संपूर्ण परिसरात दुपारी 3 ते राञौ 10 वाजेपर्यंत फायर फायटरच्या साह्याने सोडियम हायपोक्लोराईडने विशेष जंतुनाशक फवारणी/पावसाळ्यातील होणाऱ्या साथ रोगांवर आळा घालण्याकरिता डासप्रतिबंधक धुवारणी मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून, उर्वरित भागात दुसरा टप्प्यात ही फवारणी, धुरावणी मोहिम राबविण्यात येणार आहे. याशिवाय नियमितपणे करण्यात येणारी फवारणी /धुरावणी चालू राहणार आहे. दरम्यान नागरिकांनी सहकार्य करून रस्ते मोकळे ठेवावेत, गर्दी करू नये. जेणेकरून फवारणी व धुरावणी करण्यास अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम