ठाकरे सरकारचा मोठा निर्णय :“या” शासकीय कर्मचा-यांना कामावर गैरहजर राहण्याची सूट
- by Adarsh Maharashtra
- Jul 23, 2020
- 915 views
मुंबई :राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले,केमो थेरपी इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये होऊ नये,तसेच राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालयातील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी हे कोरोना विषाणूंच्या संसर्गास सहजपणे बळी पडू शकत असल्याने शासकीय कार्यालया तील उपस्थिती रोटेशन पद्धतीने नियंत्रित करण्यात आलेली आहे.गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर कार्यालयात उपस्थित राहण्या पासून शक्यतो सूट देण्यात यावी, असे आदेश मे महिन्यात केंद्राने दिले आहेत.त्याच धर्तीवर मंत्रालयीन तसेच मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील विभाग कार्यालयांमधील गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी , कर्मचारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याबाबत राज्य सरकारचा प्रयत्न होता.त्यानुसार गर्भवती महिला तसेच अवयव प्रत्यारोपण केलेले, केमो थेरपी,इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी घेत असलेले शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला असल्याने गर्भवती महिला तसेच व्याधिग्रस्त शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे.यासाठी शासकीय अधिकारी,कर्मचारी यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम