मुंबई महानगरपालिका समिती अध्यक्ष अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह
- by Adarsh Maharashtra
- Jul 21, 2020
- 1247 views
मुंबई, २१ जुलै :- कोरोनाविरोधात चार महिने प्रदीर्घ लढा दिल्यानंतर आता मुंबई सावरत असल्याची सकारात्मक बाब समोर येत आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर तब्बल ५७ दिवसांवर पोहोचला असून बरे झालेल्या रुग्णांचा दर ७१ टक्के आहे. याशिवाय, आतापर्यंत ७२,६४८ रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबईत सध्या २३,७२८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सोमवारी १०३५ रुग्णांची तर ४१ मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची संख्या १,२४,०२३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ५,७५५ एवढे झाले आहेत. अन्य कारणांमुळे २९२ रुग्णांचे मृत्यू झाले.दरम्यान, आज मुंबई महानगर पालिेका समिती अध्यक्ष आणि नगरसेवक अमेय घोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. पुढील उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमेय घोले हे गेले ४ महिने बीएमसीच्या सर्व हाँस्पिटल आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांच्या नियोजनात व्यस्त होते. सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात राहील्यामुळे करोनाचा संसर्ग झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची फोनवरुन चौकशी केली. कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनी संपर्कात आलेल्यांना याबद्दलची माहिती दिली. गेल्या ३-४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. घाबरुन जाऊ नये असा संदेश त्यांनी पाठवला.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम