रेमडिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे रॅकेट एफडीए कडून उध्वस्त

मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले)कोविड-19 या जागतिक महामारीस कारणीभूत ठरलेल्या रोगाच्या उपचारांमध्ये परीणामकारक ठरलेल्या रेमडिसिविर इंजेक्शनची उपलब्धता व मागणी यातील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या बातम्या अन्न व औषध प्रशासनास मिळाल्या होत्या. अन्न व औषध प्रशासनाचा दक्षता विभाग सदर काळाबाजार करणारे यांच्या मार्गावर होते. सदर प्रकारात गुंतलेल्या एका व्यक्तिचा मोबाइल क्रमांक सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांना प्राप्त झाला होता. मिळालेल्या मोबाईल क्रमांकावर औषधांची मागणी केली असता या औषधाची प्रत्येक व्हायल किंमत रुपये तीस हजार अशा दराने विक्री करण्याचे मान्य केले. या औषधाची छापील किंमत पाच हजार चारशे असे असते, या वेळी त्यांनी 30,000 किंमत असल्याचे सांगितले.

रेमडिसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करून अवैधपणे विक्री करणारी मोठी टोळी मुंबई व आसपासच्या परिसरात सक्रिय असल्याच्या शक्यतेवरून सुनील भारद्वाज, सह आयुक्त‌ दक्षता यांच्या नियंत्रणा खाली गोपनीय कारवाई आज रचण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी दि.18 जुलै 2020 रोजी बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड, मुलुंड पश्चिम येथे बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला व विकास दुबे व राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री कण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करतांना रंगेहात पकडण्यात आले.

पुढील तपासात COVIFOR रेमडिसिविर इंजेक्शन या औषधाच्या ०६ व्हायलचा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाचा काळाबाजार करून विक्रीच्या साखळीमध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे,  गुरविंदर सिंग व सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले.

या सर्व व्यक्तिंकडे चौकशी करून दोन ठिकाणाहून १२ व सापळ्या दरम्यान १ अश्या एकूण १३ रेमडिसिविर इंजेक्शन चा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला. या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेले  सर्व व्यक्ती औषधे दुकानदाराकडे सेल्समन अथवा औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. सदर औषध विक्री करतेवेळी रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची कोणतीही मागणी करण्यात आली नाही.

प्रकरणाचे गांभिर्य व व्याप्ती बघता एफडीएने गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात, घाटकोपर यांचे सहाय्य घेवून सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण युनिट क्रमांक सात घाटकोपर पोलीस यांच्यासमवेत अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी केली.

याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यांमध्ये श्री.नांदेकर औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई माननीय डॉक्टर राजेंद्र शिंगणे, मंत्री अन्न व औषध प्रशासन, माननीय श्री राजेंद्र यड्रावकर, राज्यमंत्री, अन्न व औषध प्रशासन यांनी अशा औषधांचा काळाबाजार व वाजवी किमतीत विक्रीवर यावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना च्या अनुषंगाने श्री अरुण उन्हाळे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन, श्री सुनील भारद्वाज सहआयुक्त दक्षता, श्री गहाणे सह आयुक्त बृहन्मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनाच्या दक्षता विभाग, बृहन्मुंबई विभाग व गुन्हा शाखा घाटकोपर युनिट क्रमांक ७ यांनी संयुक्तपणे केली.

या कारवाईत सहाय्यक आयुक्त श्री झाडबुके, सहाय्यक आयुक्त डॉ.तिरपुडे, औषध निरीक्षक श्री नांदेकर, औषध निरीक्षक गुप्तवार्ता श्री कोंडीबा गादेवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री तावडे व त्यांच्या कर्मचार्‍यांनी भाग घेतला.

रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास व औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 / 022- 26592362 या वर संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त दक्षता श्री.सुनील भारद्वाज यांनी केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट